राज्यस्तरीय रासेयो शिबिर श्रमदानातून बोंडगावदेवीचा विकास

0
5

नागपूर विद्यापीठाने घेतले बोंडगावदेवी हे गाव दत्तक

गोंदिया,दि.14- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी हे गाव दत्तक घेतले असून या गावात गेल्या तीन वर्षापासून राज्यातील सहा विद्यापीठाच्या रासेयोच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोंडगावदेवी हे गाव स्वच्छ सुंदर आणि आदर्श करण्याकरीता सातत्याने प्रयत्न राबविले जात आहेत.या गावातून जंगलात जाणार्या एका रस्त्याचे श्रमदानातून बांधकाम करण्यात आले आहे.या सात दिवसाच्या शिबिरात राज्यातील ६ विद्यापीठातील २०० विद्यार्थी झाले सहभागी होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी खासदार आदर्श गाव योजना सुरु केली.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदर्श गाव योजना सुरु केली. त्यामुळे आता विद्यार्थी आर्दश गाव योजना देखील सुरु झाली आहे .ऐकायला जरी नवीन वाटले तरी ह्या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पूर्व विदर्भातील पाच जिल्यातील पाच गावाना दत्तक घेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पाच गावांना आदर्श विद्यार्थी ग्राम घडविण्याचा संकल्प केला आहे.त्या गावामध्ये बोंडगावदेवी या गावाचा सुध्दा समावेश आहे.
या उपक्रमा अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी या गावाची निवड करण्यात आली असून मागील ३ वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०० विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गावातील लोकांना स्वच्छते विषयी हे विद्याथीनी माहिती पटवून दिली आहे.गावातील रस्ते ,नाल्या ,तलाव ,परीषर स्वच्छ ठ्वले तर आरोग्य सुदृढ राहते याची जाणीव कलापथक व जनजागृती माध्यमातून करुन दिली. गेल्या 9 जानेवारीपासून राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या 200 रासेयो स्वयंसेवकांनी हातात कुदर पावडे,झाडू घेवून गावातील रस्ते नाल्या, सुलभ शौचालये स्वच्छ केली आहेत.
यावर्षी या विद्यार्थ्यांनी बोंडगावदेवी गावच्या ज्या रस्त्यावरून बैलगाड्या देखील जाऊ शकत नव्हत्या अशा २ किलोमीटरच्या रस्त्यावर माती आणि मुरूम टाकत श्रमदानातून रस्ता तयार करुन गावातील लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे .तर या रस्त्याचा फायदा देखाली गावातील १०० शेतकऱ्याच्या ३०० एकर शेत जमिनीकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा दुवा ठरला आहे.दुसरीकडे ज्या वन विभागाच्या जागेतुन शेतकऱ्यांना शेतात जाणे शक्य होत नव्हते.त्या रस्त्यावरून शेतात जायला मिळत असल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आंनद उमटून दिसत आहे. विद्यार्थ्यांनी गावातून जाणार्या नाल्यावर बंधारा बांधल्याने त्याच्या ३०० एकर शेत जमिनीला पाणी देखाली मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देखील या कॅम्प च्या माध्यमातून शैक्षणिक ज्ञाना सोबत व्यवहारिक ज्ञान आणि तज्ञाचे मार्गदर्शन मिळत असल्याने सोबतच ग्रामीण भागातील रूढी परंपरा या विषयी माहिती होत असल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना देखील भविष्यात होणार असलयाचे विद्यार्थी सांगत आहेत. खासदार आदर्श ग्राम असो कि आमदार आदर्श ग्राम हि योजना लोकप्रतिनिधीनी नावापूरतीच अमलात आणतात मात्र विद्यार्थ्यांच्या मदतीने दंतक घेतलेल्या गावात लगेच कामाला सुरवात झाली असून विद्यार्थ्यांनी आदर्श ग्राम घडविले असल्याचे या शिबिराचे आयोजक रासेयो विभागप्रमुख प्रा. राजेश चांडक यांनी सागितले.जे काम करण्यासाठी ग्रामपंचातीला तीन वर्षात ६० लाखाचा खर्च आला असता अशा कामाना या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून करून दिल्याने शासनाच्या पैसाची बचत सुध्दा झाली आहे.