कॉटन मार्केटला भीषण आग

0
7

नागपुर,दि.20- येथील मुख्य बाजार परिसर असलेल्या कॉटन मार्केटला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या कॉटन मार्केटला लागलेली आग विझविण्याचे काम करीत आहे. परंतु आग आटोक्यात यायला वेळ लागत आहे. घटना स्थळी असलेल्या काही प्रत्येक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे महाजन नावाच्या एका व्यापाऱ्याच्या दुकाननाला आधी आग लागली. पण ती आग आटोक्यात आली नाही व वाढतच गेली आणि आजूबाजूच्या दुकानांना सुद्धा आग लागून आगीने रौर्द रूप घेतले.  कॉटन मार्केट हा परिसर अतिशय गजबजीचा आहे. दररोज हजारो लोक येथे खरेदीसाठी-विक्रीसाठी, व्यापारासाठी येतात. नागपुरात आग लागल्याची ही तिसरी घटना आहे. या आधी देखील नागपुरात अश्याच प्रकारे वेगवेगळ्या भागात आग लागली होती, त्यात सेमिनरी हिल परिसर आणि रबर फॅक्ट्रीला आग लागली होती.