चंद्रपूरात 10 जूनला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दिल्ली अधिवेशनानिमित्त बैठक

0
9

चंद्रपूर,दि.-08-राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी कृती समिती व ओबीसीत मोडत असलेल्या सर्व जात संघटनाच्यावतीने येत्या 10 जून रोज शनिवारला जनता महाविद्यालय नागपूर रोड,चंद्रपूरच्या सभागृहात दुपारी 12 वाजता बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकित दिल्ली येथे 7 आॅगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या व्दितीय महाधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा व नियोजन करण्यात येणार आहे.याकरीता जिल्ह्यातील सर्व ओबीसी पदाधिकारी,कार्यकर्ते,विद्यार्थी व अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन निमंत्रक सचिन राजूरकर यांनी केले आहे.या बैठकीत प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहिर करुन,ओबीसी समाजासाठी केंद्रात स्वंतत्र मंत्रालय स्थापण करणे.मंडल आयोग,नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात यावे.ओबीसीना लादलेली असैवंधानिक क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावी.ओबीसीसांठी लोकसभा व विधानसभेत स्वंतंत्र्य मतदारसंघ निर्माण करण्यात यावे.राष्ट्रिय मागासवर्गीय आयोगाला सवैंधानिक दर्जा देण्यात यावा.ओबीसी शेतकर्याना वनहक्क पट्टयासाठी लावलेली तीन पिढंयाची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या मंजूर करुन घेण्यासंबधी चर्चा करण्यात येणार आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे अधिवेशन 7 आगस्टला सकाळी 11 वाजता कान्स्टिटयुशनल क्लब,रफी मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे,त्यावर या बैठकित चर्चा करण्यात येणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डाॅ.अशोक जिवतोडे,निमंत्रक सचिन राजूरकर,बंबनराव फंड,प्राचार्य एन.एस.कोकोडे,दिनेश चोखारे,सुधाकर अडबाले,प्राचार्य सुर्यकांत खनके,प्रा.अनिल शिंदे,प्रा.बबनराव राजूरकर,प्रा.अशोक पोफळे,संजय टिकले,अरुण तिखे,गोविंद पोडे,प्रणय काकडे,दरेकर,रविकांत वरारकर,अतुल कोल्हे,किशोर भोयर,प्रा.बांदुरकर,संजय मारकवार,कुनघाडकर,विजय पिदुरकर,एन.डी.निखाडे,शाम राजूरकर संजय निंबाळकर,कमलाकर गुरनुले,काटकर,दिनेश काष्टी व विनायक साखरकर यांनी केले आहे.