आयएसओ झेडपीः प्लंबर झाला टेंडरकिंग?

0
14

सहा वर्षात गोपनीय माहिती लिक करून केली कोट्यवधीची कमाई
स्वच्छता कार्याकडे होतेय दुर्लक्ष, मूळ कामाला हरताळ
जि.प. प्रशासनापुढे चौकशीचे आवाहन

गोंदिया,दि.२८- आयएसओ नामांकनप्राप्त गोंदिया जिल्हा परिषद म्हणजे गैरप्रकाराचे कुरण आहे की काय? अशी शंका आता जनतेच्या मनात घर करू पाहत आहे. जि.प. मधील प्रत्येक विभागात नेहमी काही ना काही प्रकार होण्याचे आता नवीन राहिले नाही. असाच काहीसा प्रकार नेहमी वादाच्या भोवèयात राहणाèया सार्वजनिक बांधकाम गेल्या सहा वर्षापासून बिनबोभाटपणे सुरू आहे. जि.प.च्या सेवेत प्लंबर म्हणून रुजू झालेल्या एका कर्मचारी गेल्या सहा वर्षात टेंडर qकग होण्याचा भीम पराक्रम केलाय. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाèयांना सुद्धा लाजवेल एवढी माया ‘त्या‘ टेंडरqकगने जमविल्याच्या चर्चा सुद्धा आहेत. विशेष म्हणजे टेंडर क्लार्क नियुक्त असताना आणि नळ दुरुस्तीचे जबाबदारी झटकत कंत्राटदारांसाठी दलाली करणारा हा कर्मचारी राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या गावचा असल्याचा गैरफायदा घेत असल्याचे वृत्त आहे. अभियंते आणि कंत्राटदारांत सेqटग करणाèया या दलाल कर्मचाèयाची चौकशी करून जिल्हा परिषदेचे शुद्धीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेचा कुठल्याही विभाग घ्या, सावळागोंधळ हा पाचवीला असतोच. त्यातही बांधकाम विभाग म्हटले की कहरच. या विभागात साधी खुर्ची मिळविण्यासाठी भल्याभल्यांना घाम गाळावा लागतो. काही महाभागांनी गेल्या अनेक वर्षापासून या कार्यालयात चांगलाच ठिय्या जमविला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात प्लंबर पदावर नियुक्त झालेला एच.के. भिवगडे याचा समावेश असल्याचे बोलले जाते. भिवगडे हा गेल्या सहा-सात वर्षापासून कार्य.अभियंता आणि पदाधिकाèयांच्या आशीर्वादाने टेंडर क्लार्कच्या खुर्चीवर ठाण मांडून बसला आहे. उल्लेखनीय म्हणजे सदर प्लंबर ऊर्फ स्वयंघोषित टेंडरक्लार्क हा सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी येथील रहिवासी आहे. कोदामेडी हे गाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले गृहग्राम आहे.
वास्तविक टेंडर क्लार्क म्हणून नागपुरे यांची नियमित नियुक्ती आहे. नागपुरे हे जर काम सांभाळण्यात असमर्थ असतील तर त्यांनी तसे लेखी साहय्यकाची मागणी केली होती का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. जर नागपुरे यांनी सहकारी मागितला नसेल तर प्लंबर म्हणून कामाला असलेला भिवगडे हा त्यांच्या कक्षात करारनामे तयार करण्यासाठी बसण्याची मोकळीक देणाèया नागपुरे यांचीही चौकशी या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करणे अत्यावश्यक आहे. या खुर्चीवर बसल्यापासून दररोज अवैध कमाईचे साधन मिळाल्याने मूळ आस्थापनेच्या कामाकडे म्हणजे प्लंबरच्या कामाला त्या कर्मचाèयाने तिलांजली दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य असो की पदाधिकारी यांच्या कंत्राटदारांच्या करारनाम्याची प्रकिया पूर्ण करण्यापासून कार्य.अभियंत्यांची स्वाक्षरी घेऊन वित्तविभागापर्यंत पाठविण्यासाठी नेहमीच हा कर्मचारी तत्पर असतो. त्यातही अनेक कामे मॅनेज करण्यातही त्याची प्रमुख भूमिका असते. या कर्मचाèयाने आपल्या जवळच्या कंत्राटदारांना नेहमीच गैरमार्गाने कामे मिळवून त्यांचे करारनामे करून दिले आहेत. वास्तविक पाहता प्लंबरचे काम प्रशासकीय इमारतीमध्ये नळयोजनेच्या टाकीसोबतच नळ व्यवस्थित आहेत की नादुरुस्त आहेत, याची काळजी घेण्याचे व ते दुरुस्त करण्याचे काम आहे. परंतु, त्याने हे कधीही केल्याचे ऐकिवात नाही. आजही जिल्हा परिषदेच्या अनेक शौचालयामध्ये नळ नाहीत वा बंद qकवा टोटीविना आहेत. उल्लेखनीय म्हणजे माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या एका कामासंदर्भात केलेल्या दिरंगाईमुळे त्याला त्यांच्या तक्रारीवर हटविल्यासारखे करण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही भिवगडे याने आपल्या मूळ कामाला सोडून करारनाम्यावरच नजर खिळवून ठेवली. त्यातही करारनाम्याला घेऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अगदी जवळच्या असलेल्या एका कंत्राटदाराला हाताशी धरून कुठल्या निधीचे काम मंजूर झाले,निधी कुणी कुठल्या निविदा दाखल केल्या याविषयी ंइत्यंभूत माहिती पुरविण्यात सध्या आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातही प्लंबर असलेल्या भिवगडे यांनी कधीही प्रशासकीय इमारतीतील नळ दुरुस्ती केलेली नाही. सोबतच कार्य.अभियंत्यासमोर प्लंबर असलेला भिवगडे हा खुर्चीवर बसून असतो, तर अधीक्षक व वरिष्ठ लिपिक पदाचे कर्मचारी हे उभे राहून माहिती देत असतात. एवढा दरारा या टेंडरqकग याने निर्माण करून ठेवला आहे. प्लंबर असलेल्या कर्मचाèयाच्या राहणीमानाकडे बघितल्यास संपत्ती बाबतीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधीक्षक,वरिष्ठ लिपिक,प्रशासकीय अधिकारी यांना सुद्धा लाजवेल एवढी माया या कर्मचाèयांना गेल्या सहा वर्षात गोळा केल्याची धुसफूस सुरू आहे. प्लंबर पदासाठीचा दिले जाणारे वेतन बघता भिवगडे यांच्या राहणीमानाचे उच्चस्तरीय दर्जा अनेक शंका-कुशंकांना जन्म देणारा ठरू पाहत आहे. साधा प्लंबर म्हणून कामाला लागलेल्या आणि अल्पावधीत कोट्यधीश झालेल्या या व्यक्तीच्या यशाचे गमक जनतेसमोर आणण्याची जबाबदारी आता जि.प. प्रशासनावर आहे.