चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ई-उद्घाटन व भूमिपूजन

0
9

चिमूर,दि.17: चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई उद्घाटन व भूमिपूजन चिमूर येथे करण्यात आले.महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामविकास विभाग, ऊर्जा विभाग, कृषी विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या लोकोपयोगी योजनांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वन राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष
चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, खासदार अशोक नेते,आमदार मितेश भांगडिया, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, आयोजक किर्तीकुमार भांगडीया, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार अतुल देशकर आदी
व्यासपीठावर उपस्थित होते.
चिमूर तालुक्यातील भिसी व नागभीड तालुक्यातील तळोधी येथे मंजूर अप्पर तहसील कार्यालयाचे ई उद्घाटन, नागभीड तालुक्यातील शिवनाला उपसा सिंचन योजनेचे ई भूमिपूजन, बळकटीकरण अंतर्गत 11 माजी मालगुजारी तलावांचे भूमिपूजन, श्री बालाजी सागर चिमूर परिसरात पर्यटक निवास सुविधा व पार्कचे भूमिपूजन, खडसंगी ता चिमूर व नानहोरी ता ब्रम्हपुरी या उपकेंद्राचे लोकार्पण आणि मासाळ ता चिमूर या उपकेंद्राचे भूमिपूजन कृषी यांत्रिकीकरण उपभियान अंतर्गत 5 ट्रॅक्टरचे वितरण, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण बाब यातून शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या हळद लागवडीकरिता प्रोत्साहन, अनुदान वाटप या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.