जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा

0
24
गोंदिया,दि.२६ : येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी (दि. २४) जागतिक ‘फार्मासिस्ट डे‘ साजरा करण्यात आला. या वेळी नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. आर. एस. फारूकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, प्राचार्य डी. के. संघी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, भंडारा येथील मुख्य औषध निर्माण अधिकारी प्रभाकर कळंबे उपस्थित होते. या वेळी उत्कृष्ट काम करणारे औषध निर्माण अधिकारी डी. बी. दहिवले, विकास श्रीपात्रे, विनोद पटले, शरद रहांगडाले, दिलीप येळणे, प्रवीण टेकाडे, पराग साळवे, कैलास पटले, महेंद्र पटले,  भूपेश तुरकर, ज्योती जगणे यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन लोखंडे, ज्योती जगणे यांनी केले.  कुमुद कुंभलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यशस्वितेसाठी गोंदिया जिल्हा औषधी निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डी. बी. दहिवले, उपाध्यक्ष राजेश चौहान, सचिव शरद रहांगडाले, कोषाध्यक्ष विनोद पटले यांनी सहकार्य केले.