मैत्रेय आणि रोजबेली गुंतवणूकदारांचा पैसे वापस करा- रुचित वांढरे

0
30

गडचिरोली,दि.३- गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाèया मैत्रेय सव्र्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्टड्ढक्चर्स प्रा. लि., मैत्री रिअलटर अ‍ॅण्ड कन्टड्ढक्शन प्रा. लि., मैत्री सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपन्यांची व रोजबेली मालमत्ता विक्री करून परतावा देण्याच्या आराखडा जाहीर करण्याच्या मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित भाऊ वांढरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्गेश सोनवाणे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मैत्रेय,रोजबेली कंपनीतील गुंतवणूकदारांना कंपनीकडून परतावा मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या गरीब, कष्ठाळू गुंतवणूकदारांना उपासमारीची वेळ आलेली आहे.गुंतवनूकदाराणी दिलेल्या ‘कष्टाचा पैसा मिळालाच पाहिजेङ्क, असे रुचीत वांढरे यांनी पत्रकातून म्हटले आहे.मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना परतावा नेमका केव्हा व किती दिला जाईल याचा आराखडा जाहीर करावा,अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.मैत्रेयमध्ये महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील २७ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे २८०० कोटी रुपये अडकून पडले आहेत़ ५ फेबु्रवारी २०१६ पासून कंपनी बंद पडली असून, गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही़ मैत्रेयसंदर्भात शासन काय कारवाई करते याची माहिती मिळावी,अशी मागणी रुचित वांढरे, बादल गडपायले,चेतन शेंडे,श्रीकांत मुनघाटे,तुषार वैरागडे,अतुल वाढई यांनी केली आहे