पोर्ला माळी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी यशवंत शेंडे

0
19

गडचिरोली,दि.20ः- जिल्ह्यातील पोर्ला येथे 19 नोव्हेंबरला झालेल्या माळी समाज संघटनेच्या सभेत पोर्ला माळी समाज संघटनेची शाखा गठित करण्यात आली.काशिनाथ जेंगटे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.त्यात माळी समाज गाव संघटनेच्या अध्यक्षपदी यशवंत शेंडे,सचिवपदी  नितिन जेंगटे,कोषाध्यक्ष  सुनिल शेंडे,तर मार्गदर्शक म्हणून सुखदेव मोहुर्ले, मुकुंदा गावतुरे, प्रभा गुरनुले, तुळजा गावतुरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी गडचिरोली जिल्हा माळी समाजाचे संघटक हरिदास कोटरंगे,सुखदेव रुषीजी जेंगटे व ओबिसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचीत वांढरे हजर होते.