वेपिकॉन २०१८ः- १० वी वार्षिक विदर्भ चिकित्सक परिषद १६ व १७ डिसेंबरला गोंदियात

0
10
गोंदिया,दि.१३ः- येत्या १६ व १७ डिसेंबरला आयएमए गोंदियाच्यावतीने विदर्भातील डॉक्टरांची चिकित्सक परिषद गोंदियातील नमाद महाविद्यालयाच्या आडोटोरियममध्ये आयोजित करण्यात आली आहे.या परिषदेचे उदघाटन दुपारी १२ वाजता मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी डॉ.बी.जे.सुभेदार(फिजीशयन),डॉ.टी.सी.राठोड,डॉ.अजय कडुस्कर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी विदर्भातील ३० डॉक्टरांनी आपली नोंदणी केली असून दोन दिवसात १९ विषयावर विशेषज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष डॉ.दिपक बहेकार,सचिव डॉ.एल.एल.बजाज,सार्इंटिफिक समिती प्रमुख डॉ.देवाशिष चॅटर्जी,कोषाध्यक्ष डॉ.संजय अग्रवाल,विदर्भ चिकित्सक परिषदेचे अध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड,सचिव डॉ.अजय कडूस्कर उपस्थित होते.डॉ.चॅटर्जी माहिती देतांना म्हणाले की देशातील १९ विशेतज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार असून प्रामुख्याने गोंदिया जिल्हा परिसरासह शेजारील राज्यातील आजारांना लक्षात ठेवून त्या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.त्यामध्ये विदर्भातील विविध तापावर डॉ.जय देशमुख सखोल मार्गदर्शन करणार आहेत.गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात धानपिकावरील किड्यामूळे स्क्रप टायपस नामक आजाक नव्याने आढळून आला असून आजच्या घडीला डॉ.बजाज व डॉ.कुदळे यांनी १२५ च्यावर या रोगाची लागन झालेल्या रुग्णांची तपासणी केली आहे.हा आजार रुग्णासांठी धोकादायक असल्याने त्यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे.या परिषदेत डॉ.शंकर खोब्रागडे,डॉ.निखिल बंलखे,डॉ.साजन अहमद,डॉ.एस.डी.सुर्यवंशी,डॉ.विजय नेगालूर,डॉ.विजय पणीकर,डॉ.मंगेश तिवस्कर,डॉ.अपुर्व पुराणीक(इंदोर),डॉ.अशोक महासुर,डॉ.एस.एन.देशमुख,डॉ.जय देशमुख,डॉ.अमित अग्रवाल,डॉ.अश्विनी तायडे,डॉ.नितिन qशदे,डॉ.मालिनी भृषृंडी,डॉ.दिलीप गोहोकर,डॉ.अल्का सुब्रमन्यम,डॉ.विक्रांत सावजी,डॉ.दिपक जुमानी आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.