कृषी व पशुसंवर्धन विभागातील घोळाची अनु.जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षाकंडे तक्रार

0
10

कृषीसभापती श्रीमती छाया दसरे यांनी दिले निवेदन
गोंदिया,दि.१८ : महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती आज १८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांसह शासकीय कार्यालयातील आदिवासींच्या नोकरीतील स्थिती व इतर विषयाचा आढावा घेण्यासाठी पोचली.दरम्यान गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनामध्ये अधिकाèयांनी शासकीय धोरणांना बाजूला सारत नियमबाह्य खरेदी व पैशाचा वापर केल्याचे तसेच आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातील पंचायत समितीमधील कार्यरत कृषी अधिकारी हे कार्यालयात गैरहजर राहत असल्याचे निवेदन कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती छायाताई दसरे यांनी समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके व आमदार संजय पुराम यांना दिले.
कृषी विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष घटक योजना(टीएसपी) मध्ये शासन निर्णयानुसार डीबीटीनुसार साहित्य शेतकèयांने खरेदी करावयाचे होते.मात्र जेव्हा पंचायत समिती देवरीच्या गोदामाची पाहणी केली असता या योजनेचे साहित्य गोदामात आढळून आले.त्यामध्ये इंजिन,स्प्रेपंप,उडवनी पंखे,विडा आदी साहित्याचा समावेश होता.विशेष म्हणजे या साहित्याची नोंदवहीतही कुठेच नोंद नव्हती.याचा अर्थ जि.प.कृषी अधिकारी व पंचायतसमितीचे कृषी अधिकारी यांनी एमएआयडीसीच्या कंत्राटदारासोबत संगणमत करुन आर्थिक लाभासाठी शेतकèयांची दिशाभूल व फसवणूक करुन साहित्य खरेदी केली असून यामध्ये जि.प.कृषी विभागातील निमजे यांच्यासह त्यांच्यावरिष्ठांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे.साहित्यलाभार्थी शेतकèयांना हे साहित्य डीबीटीद्वारे खरेदी करावयाचे आहे हे सुध्दा सांगितले नसल्याचे आढळून आले.त्याचप्रमाणे खासगी कृषी केंद्रावर महाबीजचे जे बियाणे ६८० रुपयाला मिळत होते तेच बियाणे विभागाने ७०० रुपयाला विकत प्रति बोरीमागे २० रुपयाचा अवैध निधी गोळा करीत गैरव्यवहार केल्याचे निवेदनात म्हटले आहे.कृषी अधिकारी वंदना qशदे यांनी जिपला महाबीजने उत्कृष्ठ बियाणे पुरविल्याचे उत्तर देत खासगी दुकानातील बियाणे निकृष्ठ होेते काय अशा प्रश्नही श्रीमती दसरे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.२०१६-१७ मध्ये ५० टक्के अनुदानावर शेतकèयाना ताडपत्री वितरीत करण्यासाठी मिळालेला निधी कृषी सभापती व समितीला विश्वासात न घेताच परत केल्याने आदिवासी नक्षलग्रस्त भागातील जनतेवर अन्याय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदन स्विकारल्यानंतर अनु.जमाती समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके व आमदार संजय पुराम यांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत त्यांना जाब विचारून कारवाई करण्याचे आश्वासन सभापती श्रीमती दसरे यांना दिले.