वनतलाव,खोदतलाव व साठवण बंधाèयाच्या कामात अनियमितता

0
21

गोंदिया,दि.१३(खेमेंद्र कटरे)- जिल्ह्यातील उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्वच वनपरिक्षेत्रकार्यालयातंर्गत वनतलाव,खोदतलाव व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यात आली.मात्र या कामाच्या गुणवत्तेकडे तसेच तांत्रिकबाबीकडे कुणीच लक्ष न दिल्याने ही सर्व कामे औटघटकेची ठरणार असल्याचे चित्र सालेकसा,आमगाव व गोरेगाव वनपरिक्षेत्रातील कामांची पाहणी केल्यावर बघावयास मिळते. त्यातच वनतलाव,खोदतलावासह अनेक वनविभागातील अनेक बांधकामाचे कंत्राट हे एका विशिष्ट कंत्राटदाराला गेल्याचेही समोर आले आहे.
वास्तविक ई निविदा प्रकिया असताना ही जिल्ह्यातील सर्व कामे एकाच कंत्राटदाराला जाणे याचा विचार केल्यास कुठेतरी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने हा ईनिविदा घोटाळा तर झाला नसावा ना अशी शंका सुद्धा वनविभागाच्या बाबतीत निर्माण झाली आहे.२०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षात तयार करण्यात आलेल्या वनतलाव,खोदतलाव व जलयुक्त शिवार अंतर्गत तयार करण्यात आलेले बंधारे यांची सखोल चौकशी केल्यास तांत्रिकदृष्ट्या अयोग्य नियोजन आणि कामाची गुणवत्ता ही योग्य नसल्याचे वरील तिन्ही वनविभागासह देवरी,चिचगडच्या भागातही बघावयास मिळेल.वरिष्ठ अधिकारी या कामाच्या बांधकामाच्यावेळी पाहणी करीत नसल्यानेही स्थानिकांना त्याचा लाभ मिळतो आणि कंत्राटदाराला हाताशी घेत कमी खर्चात काम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर येत आहे.
उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी सोबतच पाणी साठवण तलावाच्या माध्यमातून पाण्याची पातळी टिकविण्यासाठी मदत व्हावी, हा उद्देश ठेवून काम करण्यात आले.सालेकसा तालुक्यात हे काम करताना मजुरांच्या हाताला काम देण्यापेक्षा राजस्थानी ट्रॅक्टरनेच काम झाल्याची माहिती qनबा,महाराजीटोला व पिपरिया येथील नागरिकांनी दिली.जे खोदतलाव तयार करण्यात आले.त्या तलावांच्या पाळीला कुठेही पिqचग करण्यात आलेली नाही.त्यामुळे पाळीवरील माती ही जोरदार पाऊस आला तर सरळ खड्यात जाणार याची प्रत्यक्ष उदाहरणच महाराजीटोला येथे बघावयास मिळाले.त्यातही या खोदतलावाचे करण्यात आले त्याठिकाणी सपाटीकरण करून पाळीवर थोडी माती घालून काम करण्यात आल्याचा देखावा करण्यात आलेला आहे.जे तलाव तयार करण्यात आलेले आहे त्याकडे बघितल्यास तांत्रिकबाबतीत घोळ असल्याचे प्रत्यक्ष बघितल्यास जाणवते.
बांधकाम करताना जी माती बाहेर काढली आणि पाळीवर टाकली गेली तिला दबाव देऊन व्यवस्थित दाबणे गरजेचे असताना ती माती दाबण्यात आली नसल्याने गेल्या दोन दिवसात आलेल्या पावसामुळे त्या पाळीवरील मातीला तडे गेल्याचे दिसून येते.अशा परिस्थितीत एखादा वन्यप्राणी त्या पाळीवरुन निघाल्यास ती माती जर चांगलीच ओली असेल तर फसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यातही खोदतलावाच्या लांबीरुंदीकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र सालेकसा वनपरिक्षेत्रातील तलावांची पाहणी केल्यावर बघावयास मिळते.
गोरेगाव तालुक्यातील दवडीपारसह ८ ठिकाणी वनतलावाचे काम करण्यात आले मात्र पावसाळा सुरू होऊनही वेस्टवेयर तयार करण्यात आलेले नाही.त्यातच गोरेगाव,आमगाव,सालेकसा येथील सर्वच कामे ही देवरी येथील बिसेन नामक एकाच कंत्राटदाराला देण्यात आली असून वनविभागाची कामे एकाच कंत्राटदाराला कशी अशा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे