मानेगाव सडकवासियांची अंडरपासची मागणी

0
12

लाखनी,दि.27ः- तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गवर वारंवार अपघात होत आहेत.त्यातच राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेले मानेगाव सडक गाव दोन्हीकडेला असल्याने रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागतो.यामुळे मुख्य रस्त्याला सर्व्हीस रोड, अंडर पास पूल व सिमेंट नालीचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या वतीने आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने (दि.26) नागपूर येथे आमदार डॉ.परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अंडर पासपुल, सर्व्हिस रोड व सिमेंट रोडचे प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून काम सुरु करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक येवोतकर यांनी दिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य व अशोका बिल्डकॉनच्या सौ.अदवाईत उपस्थित होत्या.