पिंडकेपार एमआयडीसी परिसराचा विकास करणार-आ.अग्रवाल

0
19

गोंदिया दि. ०१ :: तालुक्यातील औद्योगिकरणाचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पिंडकेपार परिसरातील औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या धर्तीवर योजना तयार करण्यात येईल. यामुळे व्यापाराला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले. .

तालुक्यातील सेंद्रीटोला (पिंडकेपार) येथे स्थानिक विकास आमदार निधीतून मंजूर २० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वेळी जि.प. शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, स्नेहा गौतम, गुनीलाल शरणागत, समीर टेंभुर्णीकर, मंजू गाते, प्रतिमा कटंगकार, पुष्पा खोब्रागडे, अंतकला ठलाल, भुमेश्वरी राऊत, अनिता बगडे, डॉ. दुलीचंद इंगोले, ओमकार दहीकर, शीला मडकाम, हेमराज गाते, हेतराम रहांगडाले, अविनाश गोंडाणे, मनोहर गाते, राजेश तालटे, कान्हुलाल गौतम, सेवकराम गौतम उपस्थित होते. यावेळी अग्रवाल यांच्या हस्ते चुन्नीलाल राऊत ते कान्हुलाल गौतम यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंटीकरण व इंदिराटोली येथील रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अग्रवाल म्हणाले, गावाच्या विकासाची प्रथम जबाबदारी ही ग्रामपंचायतची आहे. मात्र, भाजपा सरकारच्या कार्यकाळात ग्रामपंचायतचे वातावरण दूषित झाले आहे. विकास कामात राजकारण करून भाजपा अडचण निर्माण करीत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. पिंडकेपार येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याचा निर्णय आपल्याच पाठपुराव्यामुळे घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न सुरू असून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही अग्रवाल यांनी दिली.रहमतकर म्हणाले, आ. अग्रवाल यांच्या नेतृत्वात मुर्री-पिंडकेपार परिसरात रस्ते, पूल तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या सातबारातील त्रुटी दूर करण्यासाठी शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या. तसेच अतिक्रमणधारकांना पट्टे मिळवून दिल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. .