धर्मनिरपेक्षता हिच भारताची खरी ओळख-डॉ. प्रा.अपुर्वानंद

0
56

आयटक व सर्व पुरोगामी संस्था संघटनाचा उपक्रम
संघ ते सनातन .गांधी ते पानसरे शहिद पंधरवाडा.
वर्धा,दि.01ः- १९५० नंतर जगात नव्यानेच भारत या देशाचा जन्म झाला.त्याआधी राजे रजवाडे,जमीनदार ,नबाब,व प्रामुख्याने पुराेहीतशाहीचे साम्राज्य असलेला हा देश विविध जाती,धर्मात विखुरलेला हाेता.न्याय,समता,बंधुता याचा दुर दुर पर्यंत लवलेश नव्हता.१९५० ला भारतीय संविधान भारताने स्विकारले त्याचा गाभा हा धर्मनिरपेक्षता आहे. म्हणूणच विविध जाती ,पंथ,बाेली,धर्म,भाषा असूनही भारत अखंड आहे.मात्र आच ही ओळख मिटवून टाकण्याची,संविधानाला बदलविण्याची भाषा राजरोसपणे बाेलली जात आहे.आजचे राज्यकर्ते त्याला खतपाणी घालत आहे.ही धाेक्याची घंटा आपल्यासाठी आहे.त्यामुळे आपल्याला सजग राहने गरजेचे असून,धर्मनिरपेक्षता हिच भारताची खरी ओळख आहे,असे मत दिल्ली विश्वविद्यालयाचे डॉ.प्रा.अपुर्वानंद यांनी व्यक्त केले.

३० जानेवारीला म.गांधी यांची कट्टर हिंदुत्ववादी विचारसरनी असलेल्या पुणे येथील नाथूराम गाेडसे यांनी हत्या केली.हा दिवस धर्मनिरपेक्षता दिवस म्हणून साजरा करण्यासाठी आयटक व सर्व पुराेगामी संस्था,संघटना वर्धा यांच्या वतीने संघ ते सनातन, म.गांधी ते पानसरे यावर प्रबाेधन माेहीम ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत भारतभर राबविण्यात येत आहे.त्याचा एक भाग म्हणून चर्चासत्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस काँ तुकाराम भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली बच्छराज धर्मशाळेच्या सभाग्रृहात आयाेजित करण्यात आले हाेते. यावेळी मंचावर.अतिथी आयटक राज्य सरचिटणीस काँ शाम काळे .शेतकरी नेत्या प्रज्वला तट्टे नागपूर, प्रा शरद जयस्वाल,भाकप राज्य कार्यकारणी सदस्य काँ शिवकुमार गणवीर,काँ हौसलाल रंहागडाले,प्रा.पदमाकर बावीस्कर,विश्वेश्वर हाडके,आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे,अंगणवाडी युनियनचे सुनिता टिपले, विजया पावडे, ज्ञानेश्वरी डंबारे,मैना उईके,निर्माण फाऊंडेशनचे अमिर अजानी, अनिसचे राज्य सरचिटणीस गजेन्द सुरकार, आयटक जिल्हा अध्यक्ष काँ मनोहर पचारे, किसान सभेचे काँ वामनराव भेंडे प्रामुख्याने उपस्थित हाेते.
पुढे मार्गदर्शन करतांना डॉ.अपुर्वानंद म्हणाले आज भारतात मुस्लिमव्देश वाढीस लागला असून मुस्लिम व इतर अल्पसंख्याक यांची हत्या हाेत आहे.विचार पटत नाही म्हणून विचारवंताची हत्या केली जात असून गाेडसेवादी प्रव्रूत्तीने आपले डाेके वर काढलेलेअसून संघ ते सनातन चे कार्यकर्ते यात पुढाकार घेतांना दिसत असून त्याला माैनपणे राज्यकर्त्यांचे पाढबळ मिळत आहे.हा धर्मनिरपेक्षतेला धाेका आहे.खरे देशद्रोही व आतंकवादी कोण अशा प्रश्न सरकारला विचारला.
म्हणूनच अशा विषयावर परिसंवाद घेणे महत्त्वाचे आहे कारण नत्यूराम गोडसे हे कोण होते त्यांची विचारधारा कोणती . जगात शांतता राहावे अशा संदेश देणाऱ्या .सर्व जाती धर्मात सलोखा असावा असे सांगणाऱ्या महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याना गोडसेला देव मानले जाते .त्याचा पुतळा उभारला जातो तेच खरे आतंकवादी अशा प्रखर टिका करीत कामगार नेते थोर विचारवंत काँ गोविंद पानसरे यांनी जातीय व्यवस्था बाबत लिखाण केले व्याख्यान दिले म्हणून हत्या .अंधश्रद्धा व चुकीच्या चालीरीती यावर टिका केली म्हणून डॉ दाभोळकर.तर लिखान करणारे प्रा.कलबुर्गी.पञकार गौरी लंकेश यांची हत्या करणारे आतंकवादी नाहीतर कोण? अशा सवाल करीत .या सनातनी साधकांचे नाव कोर्टाने जाहीर केले.यावर विचार होणार की नाही? समाजात दुही माजवणारे व सत्याचा आवाज दडपू पाहणाऱ्या विरोधात आज सर्व पुरोगामी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन करीत डॉ अपुर्वानंद झा म्हणाले संविधानाने दिलेल्या अधिकारने आपले मत मांडले तर देशविरोधी -.बिनापरवानगीने आपल्या घरी शस्त्रसाठा ठेवणारे साधक देशभक्त .सरकार आपल्या पदाचा दुरपयोग करते. संविधानाने दिले कष्टकर्ऱ्यांचे कायदे वारंवार बदलविने एकदरी संविधानाच्या मृल्यावर हल्ला करणे खरे देशदोही आहेत .
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस व कामगार नेते काँ तुकाराम भस्मे यांनी देशभर भारतीय राज्यघटना व धर्मनिरपेक्षतेवर होत असलेल्या हल्लाच्या परिस्थितीत भारतातील पहिली कामगार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०१९ हा दिवस धर्मनिरपेक्षा दिन म्हणून पाळत असताना या परिसंवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे .तक्त बदल दो .ताज बदल दो – झुठे बेहिमानोका राज्य बदल दो! अशी म्हणायची वेळ आली असून .ज्यानी गांधीचे व सरदार पटेल यांचे वाद होते असे सांगणारे .कोण .अशा प्रचार कशासाठी .या बाबद विचार केला पाहिजे .विचारवंताचे हत्या करण्याची कारणे सत्य लोका पर्यत पोहचविण्यासाठी संघ ते सनातन गांधी ते पानसरे शहिद पंधरवाडाचे आयोजन ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी कारण गांधी .डॉ दाभोळकर .पानसरे यांच्या हत्याचा काळ आहे.म्हणूनच गांधी यांच्या कर्मभुमीतून या पंधरवाड्याला सुरुवात करण्यात येत असून २० फेब्रुवारी रोजी काँ गोविंद पानसरे यांच्या कर्मभुमी कोल्हापूर येथे सांगता करण्यात येईल .असे काँ भस्मे यांनी सांगितले
काँ शाम काळे यांनी कार्यक्रमाची रुपरेखा सांगून प्रास्तावीक केले. काँ असलम पठाण काँ गोपाल काळे काँ मारोतराव इमडवार अल्का भानसे बंडू बेलगे नलु टिपले शोभा तिवारी वंदना कोळणकर प्रज्ञा ढोले यांनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले ,तर शाहिर धम्मा खडसे यांनी गीत सादर केले.संचालन आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी तर आभार व समारोप अनिस राज्य सरचिटणीस गजेन्द सुरकार यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश खोंडे, वामनराव लांडगे, निर्मला सातपुडके, सागर दुर्योधन,हिवराज उके, गजानन पाचे ,माया तितरे, संगीता तिमांडे, शारदा कांबळे, वैशाली वाळके, नलु ठाकरे, नम्रता वानखेडे ,अशोक ओंकार, चंदा सोलत, गणपत धुरतकर ,विनोद जोशी यांनी सहकार्य केले. वर्धा, अमरावती, नागपूर ,भंडारा, गोंदिया येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.