ग्रामसेवक व अन्य कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायतचे काम थांबले

0
58

पर्यायी व्यवस्थेसाठी सरपंच संघटनेचे बिडीओना निवेदन

अर्जुनी मोर.,दि.30ः- ग्रामपंचायत मधील दुवा असलेले ग्रामसेवक संगणक परिचालक व ग्रामपंचायत शिपाई यांचे विविध मागण्यासाठी बेमुदत संप सुरू आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामे प्रभावित झाली आहेत या संपामुळे ग्राम वासियांना विविध कामासाठी अडचण निर्माण झाली आहे त्यासाठी अर्जुनी मोरगाव सरपंच संघटनेद्वारे गटविकास अधिकारी यांना पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामसेवक संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बेमुदत संपामुळे जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अनुषंगाने अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच उपसरपंच महासंघ यांनी अर्जुनी-मोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांची भेट घेतली. जनतेला लागणारे विविध दाखले दारिद्र्यरेषेखालील दाखले विवाह नोंदणी दाखले जन्म मृत्यू दाखले घर टॅक्स पावती आजच्या घडीला मिळणे बंद झाल्याने जनतेची होणारी कुचंबणा आयुष्यमान भारत किसान सन्मान योजना अश्या केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या योजणांचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिसत आहे. या सर्व बाबीचा त्रास मात्र सरपंचांना होत आहे महाराष्ट्र सदनात 228 आमदार असून त्यांनी यावर तोडगा काढून शासन स्तरावर प्रयत्न करावे त्यामुळे जनतेची होणारी अडचण दूर करण्यास सहकार्य करावे अशी मागणी सरपंच उपसरपंच सेवा महासंघ अर्जुनी मोरगाव यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्णा संग्रामे, सचिव अशोक कापगते तथा यादवराव मसराम प्रकाश टेंभुर्णी ,अजय अंबादे, राधेश्याम झोळे, दीपक रहेले, भानुदास वडगाये, दीपक सोनवाने ,प्रकाश शिवणकर, कुंदाताई डोंगरवार, नाशिकाबाई कोडापे वअन्य गावातील सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.