सभापती पदाच्या निवडणुका:तीन ठिकाणी भाजप-काँग्रेसचे गठबंधन

0
16

गोंदिया दि. १२: जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुका आज (दि.१२) पार पडल्या. भिन्न विचारावर चालणाNया भाजपा आणि काँग्रेसची आमगाव, अर्जुनी मोरगाव व देवरी येथे युती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिरोड्यात राष्ट्रवादीचा तर सडक अर्जुनी व गोरेगाव भाजपचा झेंडा फडकला असून गोंदिया पंचायत समितीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे.
गोंदिया पंचायत समितीत २८ पैकी १५ जागा पटकावून काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे. सभापतीपदी स्नेहा गौतम आणि उपसभापतीपदी ओमप्रकाश भक्तवर्ती विराजमान झाले आहेत.
तिरोडा : येथील पंचायत समितीत १४ पैकी ९ जागा राष्ट्रवादीने पटकावल्याने स्पष्ट बहुमत मिळाला. आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उषा संजय विंâदरले तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे उपसभापती डॉ.किशोर पारधी विराजमान झाले. विशेष म्हणजे तिरोडा तालुक्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. भाजपला ४ जागा मिळाल्या असल्यातरी स्पष्ट बहुमतासह राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे.
सडक अर्जुनी : येथील पंचायत समिती निवडणुकीत १० पैकी भाजपला ७, राकाँला २ तर काँग्रेसला १ जागा मिळाली होती. स्पष्ट बहुमतासह आजच्या निवडणुकीत सभापतीपदी भाजपच्या कविता रंगारी तर उपसभापती विलास सिताराम शिवणकर निवडूण आले. एवंâदरीत स्पष्ट बहुमतांसह गोंदिया काँग्रेस, तिरोड्यात राष्ट्रवादी तर सडक अर्जुनीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे.
आमगाव : येथील पंचायत समितीच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीला ५ भाजपला ४ तर काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळाला होता. सर्वाधिक राष्ट्रवादीच्या जागा असताना देखिल काँग्रेस आणि भाजपच्या गठबंधनामुळे राकाँ सत्तेबाहेर झाली. सभापतीपदी काँग्रेसच्या हेमलता संजय डोये तर उपसभापतीपदी भाजपचे ओमप्रकाश मटाले निवडून आले.
सालेकसा : येथील पंचायत समितीवर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. या ठिकाणी ८ जागांपैकी काँग्रेसला ४, भाजपला ३ आणि राष्ट्रवादीला फक्त १ जागा मिळाली होती. तरीदेखिल राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पदाधिकाNयांनी ‘तेरी भी चुप-मेरी भी चुप’ करत संयुक्त झेंडा फडकवला आहे. सभापतीपदी काँग्रेसचे हिरालाल फाफनवाडे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या राजकुमारी विश्वकर्मा निवडून आले आहेत.
अर्जुनी मोरगाव : येथील पंचायत समितीच्या १४ जागांपैकी भाजप ७, काँग्रेस ३ तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. या ठिकाणी भाजप व काँग्रेसची अनपेक्षीत युती झाली. सभापतीपदी भाजपचे अरवींद शिवणकर तर उपसभापती काँग्रेसच्या आशा इंद्रराज झिलपे यांची निवड करण्यात आली. निवडणुकी दरम्यान राकाँचे चारही पंचायत समिती सदस्य अनुपस्थीत राहिल्याने चर्चांना पेव पुâटले होते.
गोरेगाव : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे दिलीप चौधरी तर उपसभापती भाजपचे सुरेंद्र बिसेन यांची निवड झाली. या निवडणुकीत भाजपला ५ मते मिळाली. काँग्रेसचे रामचर्जे यांना ३ मते मिळाली. राकाँचे केवल बघेले व लिला बोपचे यांनी मतदान केले नाही. एवंâदरीत गोरेगाव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला.
देवरी : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज रविवारी (दि.१२) येथील पं.स. सभागृहात पार पडली. यात भाजप व काँग्रेसची अभद्र यूतीने सभापतीपदी भाजपच्या चिचगड पं.स.क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या सदस्या सौ.देवकी धनाजी मरई आणि उपसभापतीपदी काँग्रेसच्या पुराडा पं.स.क्षेत्रातील सदस्या सौ.सुनंदा गणेश भेलावे या निर्विरोध विजयी ठरल्या. मात्र या निवडणुकीत भाजप-काँग्रेस यामध्ये झालेल्या युतीचा विरोध म्हणून शिवसेनेच्या दोन्ही केशोरी पं.स.क्षेत्रातील सदस्य नरेंद्र मडावी ककोडी क्षेत्राचे सदस्य गणेशदास सोनबोईर यांनी या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला हे विशेष. ही निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.