26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024
Home Blog Page 5985

राज्य सरकारची ‘महा ई-लॉकर’ सुविधा

0

मुंबई-नोकरीसाठीच्या मुलाखती, बँकेसंबधी कामे किंवा अन्य कारणांसाठी आपली महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत घेऊन फिरावी लागतात. कधी कधी तर, एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढावते. त्यामुळे कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची ही कटकट संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने ‘महा ई-लॉकर’ नावाचा एक उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ई-लॉकर सुविधा ही आधार कार्डशी संलग्न करण्यात आली आहे. आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
‘महा ई-लॉकर’ म्हणजे नेमके काय?
राज्य सरकारने ‘महा ई लॉकर’ ही सुविधा पूर्णपणे मोफत सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून जन्माचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्रे ई लॉकरमध्ये अपलोड करता येतात. आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण अपलोड करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता सॉफ्ट कॉपी आपल्या लॉकर मध्ये अपलोड केली जाईल. मात्र, या ई-लॉकरसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
या ई-लॉकरमुळे कधीही, कुठेही आपली महत्त्वाची कागदपत्रे हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करता येतील
१. elocker.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. इथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकून ‘साइन अप’ करा.
२. यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्ध्यातासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉगिन करावं लागेल. हा पासवर्ड टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’ वर क्लिक करा.
३. या प्रक्रियेनंतर तुम्हाला ६ अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरुपी असतो.
४. तुम्ही तयार केलेला पिन टाकून ‘व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा ‘महा डिजिटल लॉकर’ तयार होईल

पवार बोलतात ते कधीच करत नाहीत- उध्दव ठाकरे

0

मुंबई-शरद पवारांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि करतात ते बोलत नाहीत असा इतिहास आहे, अशा खोचक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणारे पवार आज मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याचे विधान करतात. त्यामुळे पवार कधी काय बोलतात हे त्यांच्याच लक्षात राहत नाही. मतदार राजा पवार साहेबांना माफ कर, पवार काय करतात आणि काय बोलतात हे त्यांना कळत नाही, असा उपरोधिक टोला उध्दव यांनी पवारांना लगावला तर, ज्यांच्याबरोबर गेली २५ वर्षे राहिलो ते या निवडणुकीत आमच्या विरोधात लढले आणि आम्ही ज्यांच्या विरोधात होतो त्यांना ते सोबत घेत आहेत. त्यामुळे दुर्देवाने कोण कोणाबरोबर आहे ते कळतच नाही, अशी उध्दव यांनी भाजपवर टीका केली.

पुन्हा निवडणुका होऊ शकतात: पवार

0

पुन्हा निवडणुका होऊ शकतात: पवार

अलिबाग: ‘विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे ते सरकार बनवू शकत नाहीत; शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याचेही घडत नाही; ते होत नसल्याने सरकार बनत नाही. अशा परिस्थितीमध्ये दोन पर्याय असू शकतात. एक म्हणजे पाच-सहा महिन्यांसाठी पुन्हा राज्यपालांची राजवट लागू होऊ शकते आणि त्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या मार्गाने जाण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते,‘ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. अलिबागमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू आहे.त्यावेळी बोलत होते.या अधिवेशऩात आमदार खासदारांना मागर्दशर्न करण्यात येत आहे.याप्रसंगी मंचावर राज्यसभा खासदार प्रफुल पटेल,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,दिलीप बऴसे पाटील यांच्या राष्ट्रवादीचे सवर् नेते उपस्थित होते.

अधिवेशनासाठी कार्यालय व निवास व्यवस्था सज्ज ठेवा : अनूप कुमार

0

नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ सचिवालयासह हैद्राबाद हाऊस तसेच मंत्रिमहोदय व वरिष्ठ अधिकार्यांचे कार्यालय व निवास व्यवस्था सज्ज ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिल्यात. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विधिमंडळ अधिवेशनासंबंधी करावयाच्या विविध विभागांच्या कार्यालय तसेच निवास व्यवस्थेसंदर्भात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, महसूल विभागाचे उपायुक्त एम. ए. एच. खान, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त हेमंत पवार, माहिती संचालक मोहन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजित सगणे, कार्यकारी अभियंता पी. डी. नवघरे, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, स्वागताधिकारी प्रकाश पाटील तसेच विविध विभागांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. विधिमंडळ अधिवेशनासाठी निवास व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देतांना अतिरिक्त खर्च टाळण्याच्या सूचना करतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, रविभवन, नागभवन आदी शासकीय निवासस्थानाच्या परिसरात विधिमंडळासाठी आवश्यक सुविधांचा नियमित आढावा घेण्यात येईल. तसेच अधिवेशनापूर्वी किमान आठ दिवस संपूर्ण व्यवस्था सज्ज असेल यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कामांचे नियोजन करावे. या परिसरात स्वच्छता ठेवण्यासोबतच वाहतूक व्यवस्था निश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी रविभवन येथे निवास व्यवस्था असून वरिष्ठ अधिकाºयांसाठी शहरातील शासकीय तसेच निमशासकी य विभागांच्या विश्रामगृहामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व विश्रामगृहात असलेल्या आवश्यक सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. सचिव तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयांच्या निवास व्यवस्थेसाठी आढावा यावेळी घेण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदार निवास ते विधानमंडळ सचिवालय येथे एस. टी. महामंडळातर्फे वाहतूक व्यवस्था, महानगरपालिकेतर्फे या परिसराची नियमित स्वच्छता, अग्मिशमन व्यवस्था, विद्युत व्यवस्था. तसेच माहिती व जनसंपर्क विभागातर्फे तयार करण्यात येणाºया दूरध्वनी पुस्तिकेच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

बागडे आणि फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

0

मुंबई- राज्यातील भाजप सरकारने विधानसभेत जिंकलेल्या विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणा-या दोन याचिकांवर २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. केतन तिरोडकर आणि राजकुमार अवस्ती या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात बहूमत नसताना देखील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला.
विधानसभेत २८८ सदस्य आहेत. तर भाजपकडे केवळ १२३ आमदार आहेत. बहूमतासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असताना भाजपने बहूमत कसे काय सिद्ध केले. तसेच बहूमत सिद्ध करण्यासाठी आवाजी मतदानाचा वापर करण्यात आला. सभागृहातील १२३ सदस्यांनी मोठ्याने ओरडून १४५ सदस्य सरकारच्या बाजूने असल्याचे दाखवल्याचे तिरोडकर यांनी याचिकेत म्हटले आहे.
इतक नव्हे तर तिरोडकर यांनी फसवणूक आणि कट केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

श्रद्धांजली वाहिल्यावर राज आणि उद्धव भेट

0

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दुपारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाजवळ जाऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोमवारी सकाळपासून हजारो चाहते शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते संजय राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते आणि इतर नेते यावेळी स्मृतिस्थळाजवळ उपस्थित आहेत. राज ठाकरे यांनी पुष्प वाहून बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी तिथेच उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व चर्चा केली.

आता उपस्थिती भत्ता २०० रूपये

0

गोंदिया-ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामसभेचा उपस्थिती भत्ता २५ रूपये देय होता़ अत्यल्प भत्ता मिळत असल्यामुळे कित्येक ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करीत होते. ग्रामसभेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने विकासात्मक धोरणातून भत्ता वाढ करण्याचे ठरविले होते. आता राज्य शासनाने ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत भत्त्यात सरसकट आठपट वाढ केली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात देखील शासनाने लोकसंख्येच्या आधारावर वाढ केली आहे़

सध्या शहरीकरण वाढत चालले आहे़ कित्येक गावांची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे़ राज्यात एकूण २७९०६ ग्रामपंचायती आहेत़ मात्र वाढत्या शहरीकरणात देखील ५५ टक्के नागरिक अजूनही ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंंचायत राज व्यवस्थेतून प्रयत्न सुरू आहेत. पंचायतराज व्यवस्थेच्या योग्य मार्गदर्शकतत्त्वानुसार अनेक गाव स्वावलंबी झाली आहेत़ तरीही आदिवासी, अतिमागास क्षेत्रातील ग्रा. पं. सदस्य ग्रामविकासाच्या बाबतीत उदासीन आहेत़ कित्येक गावांत ग्रामसभा केवळ सोपस्कार झाले आहे़ यामुळे शासनाच्या विकासात्मक तत्वांना तडा जात आहे. ग्रामसभेतील उपस्थिती अत्यल्प असते. ग्रा. पं. चे सदस्य म्हणून निवडून आल्यावर देखील नाममात्र २५ रूपये उपस्थिती भत्ता मिळते, या सबबीमुळे सदस्य ग्रामसभेला अनुपस्थित राहतात. ग्रामविकासाकरिता सदस्यांना ग्रामसभेत उपस्थित राहिले पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने सदस्यांच्या भत्त्यात भरघोष वाढ केली आहे़ सदस्यांना २५ रूपये भत्त्यावरून आठपट वाढ झाल्याने सरसकट २०० रूपये उपस्थिती भत्ता देय राहणार आहे. वर्षभरात होणाऱ्या १२ ग्रामसभांना २०० रूपये प्रमाणे भत्ता ग्रामपंंचायत सदस्यांना मिळणार आहे़ भत्त्याप्रमाणेच सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी कित्येक दिवसापासून होत होती़ मिळणारे मानधन हे त्या गावातील लोकसंख्येवर आधारीत राहणार आहे़ देय असलेल्या मानधनात शासन ७५ टक्के रक्कम देणार असून ग्रा. पं. ला २५ टक्के रक्कमेचा वाटा उचलावा लागणार आहे़

४९९ बालके कुपोषणाच्या विळख्यात

0

भंडारा-

महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत.एकात्मिक बाल विकास सेवा योजना गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण तरी देखील कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण बाल पोषण पद्धतीमध्येच व्यापक बदल होणे गरजेचे आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ० ते ६ वर्ष वजन घेतलेल्या बालकांची संख्या ८६ हजार ३८३ असल्याची नोंद आहे. यातील तीव्र कमी वजन गटात मोडणारी बालके ४९९ आहे. साधारण श्रेणीत ८२ हजार ५६८ बालकांचा समावेश आहे. कमी वजन गटातील बालकांचा आकडा ३ हजार ३१६ आहे. यात सर्वाधिक तीव्र कमी वजनाच्या क्षेणीतील बालके ही भंडारा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना – भाजपा युतीसाठी RSS ची मध्यस्थी

0

नागपूर – भाजपा आणि शिवसेनेमध्ये युती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा टेकू घेण्यावरुन भाजपावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच आता मोहन भागवत मैदानात उतरल्याने भाजप – शिवसेनेमध्ये पुन्हा युती होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सत्ता स्थापनेत शिवसेनेसोबतची चर्चा फिस्कटल्यावर भाजपाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकारला तारले आहे. भाजपाने उघडपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची नाचक्की टाळली असली तरी भविष्यात राष्ट्रवादीच्या टेकूने सरकार चालवण्यास भाजपातील एक गट विरोधात आहे. तर शिवसेनेतील अनेक आमदारही सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार आहेत. अखेरीस सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि भागवत यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौ-यावरुन परतल्यावर याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही भागवत यांनी दिल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यामुळे भागवत शिवसेना – भाजपामध्ये समेट घडवण्याच यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कापूस शेतक-यांची भाजपाने केली १९०० रूपयांनी फसवणूक

0

नागपूर – विदर्भातल्या कापूस शेतक-याची महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा फसवणूक केल्याने शेतक-यांमध्ये तीव्र संताप पसरलेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केलेल्या घोषणांमध्ये ‘कापूस उत्पादक शेतक-याला क्विंटल मागे पाच हजार रुपये भाव देऊ’ असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षामध्ये आता सरकारतर्फे जास्तीत जास्त ३१०० रुपये भाव देण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात १९०० रुपयांनी सरकारने फसवणूक केली असा शेतक-यांचा आक्षेप आहे.
विदर्भातल्या कापूस एकाधिकार योजनेमध्ये आतापर्यंत सरकार भावाची हमी देत होते आणि त्यामुळे त्या हमीभावापेक्षा कापूस उत्पादक शेतक-याला काहीशी जास्तच किंमत मिळत होती. गेल्यावर्षी सहा हजार रुपयांपर्यंत शेतक-याला क्विंटलमागे भाव मिळाला होता. १९७० साली महाराष्ट्राच्या त्यावेळच्या कॉँग्रेस सरकाराने कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करून शेतक-यांचा कापूस पाडून घेतला जाणार नाही, यासाठी
प्रत्यक्ष बाजारात उतरून खरेदी सुरू केली. पण गेल्या काही वर्षात अडते आणि दलाल यांच्यामुळे
ही योजना अडचणीत आली होती. तरीसुद्धा सरकारने शेतक-याला पाच हजार रुपयापेक्षा जास्त भाव मिळेल, अशाच पद्धतीने हमीभावाची व्यवस्था केली. मात्र, आता शेतक-याला भाव मिळत नसल्यामुळे विदर्भातील शेतकरी वा-यावर सोडल्यासारखा आहे.